Episodios

  • Episode 25 ft. RJ Dnyaneshwari (ज्ञानेश्वरी) | Around The World | Veena World
    Apr 10 2026
    आवाजाच्या दुनियेतून प्रवासाच्या जगात, एक वेगळाच प्रवास!या भागात आपण भेटतो एका रेडिओ जॉकी ज्ञानेश्वरीला, जिचा आवाज तुम्ही तासन्तास ऐकू शकता. पण तिच्या प्रवासाच्या कथा तुम्हाला अजून जास्त गुंतवून ठेवतात.

    एका १ तासाच्या शोमध्ये RJ नेमकं किती आणि कसं बोलतं? इथून सुरू झालेल्या या गप्पा आपल्याला घेऊन जातात गिरगावच्या गल्ल्यांमध्ये. तिथे बालपण, खाद्यसंस्कृती आणि ‘वाड्यां’वरून ओळखल्या जाणाऱ्या जागांची एक वेगळीच दुनिया आहे.

    आध्यात्मिक ठिकाणांपासून सुरू झालेला तिचा प्रवास, ट्रॅव्हल ब्रोशर्स गोळा करण्याची आवड, आणि इंटरनेटपूर्व व नंतर बदललेली प्रवासाची पद्धत, या सगळ्यांमधून एक सुंदर प्रवास उलगडतो. आज माहिती इतकी सहज उपलब्ध आहे की ‘surprise’ हरवत चाललंय. म्हणूनच ती सांगते की इंटरनेटवर जाण्यापूर्वी पुस्तकं वाचा. त्यामुळे कल्पनाशक्ती वाढते.

    बाली आणि हिमालयाबद्दलचं तिचं आकर्षण, पाँडिचेरी आणि हम्पी तिच्या wishlist मधील ठिकाणं, आणि पहिल्या foreign trip बद्दल कुटुंबाची असलेली भीती, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचाच एक भाग सापडेल. Monday ते Saturday काम करणाऱ्या RJ च्या आयुष्यात प्रवासासाठी वेळ कमी होता. पण आता ब्रेकमध्ये ती जग अजून जवळून अनुभवू इच्छिते. तुमचा favourite travel memory कोणता? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!


    From the world of radio to the world of travel, this is a journey worth listening to.

    In this episode, we sit down with a Radio Jockey whose voice you may have heard for hours, but whose travel stories will keep you even more engaged.

    Starting with what really goes into a one-hour RJ show, the conversation with RJ Dnyaneshwari takes us through her childhood in Girgaon. It explores its food culture, iconic joints, and the unique way places are named after “wadas.”

    Her travel journey began on a spiritual note. She collected travel brochures and dreamed of destinations long before the internet made everything accessible.

    Today, with information just a click away, she reflects on how we are losing the element of surprise. She believes that reading books before searching online helps build imagination.

    From her fascination with Bali and the Himalayas to her wishlist destinations like Pondicherry and Hampi, and even the anxiety around her first international trip, this episode is filled with relatable moments.

    With a demanding Monday-to-Saturday RJ schedule limiting her travel, she now looks forward to exploring the world more than ever during her breaks.

    What is your favorite travel memory? Tell us in the comments!
    Más Menos
    57 m
  • Episode 24 ft. Achyut Godbole (अच्युत गोडबोले) | Around The World | Veena World
    Apr 6 2026
    ज्ञान, जिज्ञासा आणि सतत शिकत राहण्याची भूक या सगळ्यांचा संगम असलेला हा खास भाग आहे.

    या भागात आपल्यासोबत आहेत प्रख्यात लेखक आणि विचारवंत Achyut Godbole. IT, गणित, विज्ञान, कला, संगीत, संस्कृती आणि मानसशास्त्र अशा विविध विषयांवर त्यांनी मांडलेले विचार या गप्पांमधून उलगडतात.

    लहानपणी १३ घरांमध्ये राहणं, IBM च्या इंटरव्ह्यूला पायजमा-बुशशर्टमध्ये जाणं, आणि सतत नवीन शिकत राहण्याची त्यांची वृत्ती या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रवासाला वेगळं बनवतात.

    Patni Computers आणि L&T मधील अनुभव, जगभरातील लोकांशी संवाद, आणि वाचनाची प्रचंड आवड यामुळे त्यांनी ७५ हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत.

    या भागातील एक महत्त्वाचा विचार असा आहे. AI नोकऱ्या काढून टाकणार नाही, पण AI जाणणारे लोक इतरांना मागे टाकतील.

    तंत्रज्ञानापासून ते प्रवास, खाद्यप्रेम आणि स्कॅन्डिनेव्हियन देशांबद्दलचं आकर्षण या सगळ्यामुळे हा भाग तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.

    तुमचा biggest takeaway काय होता? कमेंट्समध्ये नक्की सांगा!


    This is a conversation about curiosity, learning, and staying relevant in a changing world.

    In Episode 24, we are joined by Achyut Godbole, whose insights span across IT, science, mathematics, art, music, and psychology.

    From living in 13 different homes to walking into an IBM interview in traditional attire, his journey reflects confidence, individuality, and a relentless drive to learn.

    With experience at Patni Computers and L&T, and a deep love for reading, he has authored over 75 books across diverse subjects.

    One powerful takeaway from this episode is simple. AI won’t replace people. But people who know AI will replace those who don’t.

    From technology to travel, and from food to philosophy, this episode is filled with perspectives that stay with you.

    What was your biggest takeaway? Tell us in the comments!
    Más Menos
    2 h y 19 m
  • Episode 23 ft. Leena Bhagwat (लीना भागवत) | Around The World | Veena World
    Mar 27 2026
    आपण एखादं नाटक पाहतो तेव्हा त्यामागची मेहनत दिसते, पण त्या पात्रांना जिवंत करण्यासाठी एक कलाकार जग कसं पाहतो?

    ‘वर्ल्ड थिएटर डे’च्या खास मुहूर्तावर, अभिनेत्री लीना भागवत यांनी उलगडलाय त्यांचा हा प्रवास!
    सुनीला पाटील यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी सांगितलं की त्यांना समुद्रकाठापेक्षा डोंगरांची शांतता का आवडते. अमेरिकेत टेस्लामध्ये बसण्याचा अनुभव असो किंवा नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांना भारत-पाकिस्तान सामन्याचा स्कोअर सांगणं—लीना ताईंचे हे अनुभव तुम्हाला कधी हसवतील तर कधी अंतर्मुख करतील.

    जुनी मंदिरं, कॉफीचा सुगंध आणि महाराष्ट्रातील गावकुसातील पर्यटन यावर रंगलेल्या या गप्पा नक्की पाहा.
    हा भाग प्रवासाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देणारा आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!


    Happy World Theatre Day!

    To celebrate, we have a very special guest who believes that every journey is a performance in itself, Leena Bhagwat.

    In Episode 23, she sits down with Sunila Patil to discuss why she prefers “slow travel” and how the sounds of the wind and birds help her craft her roles on stage.

    From her first Tesla ride in the USA to the discipline of international theatres, and her candid confession about fearing take-offs, Leena shares it all.

    Discover why she avoids network-heavy places and why a cup of coffee is her favorite welcome to a new country.
    Join us for a conversation that proves travel is the ultimate creative process!
    Let us know your favorite travel memory in the comments below!

    Credits:
    Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.
    Agency: @tillitclicks
    Production House: Evertale Studios
    Más Menos
    1 h y 7 m
  • Episode 22 ft. Shakti Salgaonkar (शक्ती साळगांवकर) | Around The World | Veena World
    Mar 20 2026
    गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वर्षाचे संकल्प सोडताना, प्रवासाची एक नवी दृष्टी देणारा हा खास भाग!आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेलं 'कालनिर्णय' आजच्या डिजिटल युगात कसं बदलतंय, इथून या गप्पांची सुरुवात होते.

    शक्ती साळगांवकर सांगतात की, कालनिर्णय म्हणजे केवळ माहिती नाही, तर तो लोकांशी जोडलेला एक भावनिक धागा आहे. पण या वारशासोबतच शक्ती यांची एक 'ट्रॅव्हलर' म्हणून असलेली ओळख तितकीच रंजक आहे. न्यूयॉर्कमध्ये आपल्या बहिणीला भेटायला गेल्यावर तिथल्या गल्लीबोळांत हरवणं असो किंवा कोविडच्या काळात रिकामं झालेलं वॉल स्ट्रीट स्टेशन अनुभवणं, त्यांच्या प्रवासाच्या कथा आपल्याला वेगळा विचार करायला लावतात.

    आपल्या वडिलांसोबत मालवण-गोव्याच्या ट्रीप्सवर जाऊन तिथल्या स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आणि बिर्याणीचा घेतलेला आस्वाद, हा त्यांच्या भटकंतीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. अजूनही डिस्नेलँड पाहायचं स्वप्न डोळ्यात असलेल्या शक्ती साळगांवकर यांचा हा प्रवास, परंपरा आणि आधुनिकता यांचा एक सुंदर संगम आहे.या भागात त्यांनी दिलेली खास 'ट्रॅव्हल टिप' ऐकायला विसरू नका!

    As we step into the New Year following Gudi Padwa, we bring you a conversation that perfectly blends timeless tradition with a modern global outlook!

    Shakti Salgaonkar opens up about the soul of Kalnirnay, explaining how a brand built on ink and paper is essentially a business of human emotions. But beyond the almanac, this episode explores Shakti’s life as a passionate traveler. Whether it’s planning sister-trips in the vibrant streets of New York or witnessing the haunting silence of a deserted Wall Street during the pandemic, her stories offer a unique lens on the world.

    From her deep-rooted love for the local flavors of Malvan and Goa shared with her father to her quest for the perfect Biryani, Shakti emphasizes why every traveler must embrace local cultures. Even with a legacy brand under her belt, she shares the relatable charm of still having 'Disneyland' on her bucket list. Join Neil Patil and Shakti Salgaonkar for an episode that proves travel is about understanding a place for what it truly is. Don’t miss her expert travel tips at the end of the episode!
    Más Menos
    56 m
  • Episode 21 ft. Jitendra Joshi (जितेंद्र जोशी) | Around The World | Veena World
    Mar 13 2026
    जेव्हा वाटा संपतात आणि गोष्टी सुरू होतात!जितेंद्र जोशी — एक असा चेहरा ज्याने आपल्या अभिनयाने आपल्याला रडवलं आणि हसवलं सुद्धा. पण पडद्यामागचा हा ‘माणूस’ जेव्हा प्रवासाला निघतो, तेव्हा तो फक्त प्रेक्षणीय स्थळं पाहत नाही, तर तो माणसं आणि त्यांच्या कथा शोधतो. या भागात जितेंद्र आपल्याला घेऊन जाणार आहेत त्यांच्या भारतभ्रमंतीच्या आणि जागतिक सफरीच्या अशा वळणांवर, जिथे कोणतंही नियोजन नव्हतं — होतं ते फक्त कुतूहल.

    प्रवासाने त्यांना एक माणूस म्हणून कसं बदललं? एका कलंदर प्रवाशाची ही गोष्ट तुम्हाला पुन्हा एकदा बॅग भरून बाहेर पडायला भाग पाडेल.बघा, एका कलाकाराचा जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन — 'Around The World' च्या नवीन भागात, शुक्रवारी दुपारी ५:०० वाजता! हा व्हिडिओ आवडला असल्यास Like करा आणि तुमच्या फिरस्त्या मित्रांसोबत Share करा!

    Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.
    Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.
    Production House: Evertale Studios

    Where the roads end, and stories begin! We know Jitendra Joshi as an actor who moves us with his craft. But when the man behind the characters sets out to travel, he doesn’t just look for sightseeing spots — he searches for people and their stories. In this episode, Jitendra takes us through his journeys across India and the world.

    These aren’t your typical planned itineraries; they are impulsive, heartfelt explorations born out of pure curiosity. Discover how travel transformed him as a person and why sometimes getting lost is the only way to truly be found. Join us for a conversation that is as poetic as it is profound.

    If you enjoyed this episode, please Like, Share, and leave a comment about your favorite travel memory. Subscribe to the Veena World YouTube channel for more incredible stories!

    Credits:Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.
    Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.
    Production House: Evertale Studios
    Más Menos
    2 h y 13 m
  • Episode 20 ft. Sharmishtha Raut (शर्मिष्ठा राऊत) | Around The World | Veena World
    Mar 6 2026
    'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! आज जागतिक महिला दिनानिमित्त आमच्यासोबत आहेत अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊत. मनोरंजन विश्वातील ग्लॅमर आणि जबाबदाऱ्या सांभाळताना, स्वतःला रिचार्ज करण्यासाठी त्या नेहमीच प्रवासाचा आधार घेतात. आपल्या अटींवर जगणाऱ्या आणि तितक्याच आवडीने जग फिरणाऱ्या शर्मिष्ठाचा हा सफरीनामा नक्कीच प्रेरणादायी आहे. कधी आलिशान हॉटेलमधील सुखसोयी तर कधी निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेला निवांत वेळ—प्रवासाने त्यांच्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल घडवून आणले आणि त्यांना आलेले काही 'लाईफ चेंजिंग' अनुभव कोणते होते, हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड नक्की पाहा! संपूर्ण एपिसोड आता उपलब्ध!

    Welcome to a new episode of the 'Around The World' podcast! On the occasion of International Women’s Day, our guest is the multi-talented actress and producer, Sharmishtha Raut. While she manages the high-pressure world of production and acting, she finds her ultimate "reset" in exploring new destinations. Sharmishtha’s journey is a perfect reflection of a modern woman who lives life on her own terms and travels with passion. Whether it is indulging in luxury or finding peace in the middle of nowhere, listen to her share some of her most life-changing travel experiences and how they shifted her perspective on life. Watch this engaging conversation between two empowered women travelers! Watch the full episode now!

    Credits:
    Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.
    Agency: ‪Till It Clicks
    Production house: Evertale Studios
    Más Menos
    1 h y 20 m
  • ATW MAHESH LIMEY
    Feb 27 2026
    'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!

    आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आमच्यासोबत आहेत नॅशनल अवॉर्ड विजेते सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये. महेशजी हे केवळ एक उत्तम निरीक्षक नाहीत, तर ते एक अफाट स्टोरीटेलर आहेत. राजस्थान, काश्मीर, लडाख ते न्यूझीलंड, जपान आणि माचू पिचूपर्यंतचा त्यांचा प्रवास जेव्हा ते उलगडतात, तेव्हा त्यांच्या शब्दांमुळे ते संपूर्ण ठिकाण आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतं.

    रिचर्ड गेअरसोबत काम करण्याचा अनुभव असो किंवा ऋषिकेशमधील गंगेच्या काठावर चित्रीकरणादरम्यान आलेली दैवी अनुभूती—त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. एका महान सिनेमॅटोग्राफरची जग बघण्याची ही विलोभनीय नजर अनुभवण्यासाठी हा एपिसोड नक्की ऐका!


    Welcome to a new episode of the 'Around The World' podcast!

    On this special Marathi Bhasha Gaurav Din, our guest is National Award-winning cinematographer and director, Mahesh Limaye. While he is known for his stunning visuals, in this conversation you will experience his gift as a master storyteller.

    Maheshji describes his travels—from the rugged mountains of Leh-Ladakh to the streets of Japan and the heights of Machu Picchu—with such vivid detail that a complete picture forms right before your eyes.

    Hear about his time working with Hollywood actor Richard Gere and the divine moments he experienced by the Ganga. From international wonders to the local charm of Bhor and Pench, listen to a visual genius narrate the world as only he can.

    Listen to the full episode now!

    Credits: Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd. Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd. Production house: Evertale Studios
    Más Menos
    2 h y 19 m
  • Episode 18 ft. Amey Kadam (अमेय कदम) | Around The World | Veena World
    Feb 20 2026
    'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!

    या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत अमेय कदम. अमेय हा केवळ एक कंटेंट क्रिएटर नसून, तो एक संवेदनशील फोटोग्राफर आणि Roadies 7 चा माजी स्पर्धक देखील आहे. पण या सगळ्यांत त्याची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे तो एक अफाट खाद्यप्रेमी आहे.

    हा एपिसोड अतिशय खास आहे, कारण या पॉडकास्टच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टुडिओमध्ये खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. अमेयसाठी जेवण ही केवळ भूक भागवण्याची गोष्ट नसून, ती एक भावना आहे.

    या भागात तो महाराष्ट्राच्या गल्लीबोळांमधील खाद्यसंस्कृतीपासून ते लडाख, भूतान आणि थेट ऑस्ट्रेलियापर्यंतच्या प्रवासाचे अनुभव उलगडतो.

    प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नसून, तो स्वतःला बदलून टाकणारा अनुभव कसा असू शकतो, हे अमेयच्या गप्पांमधून आपल्याला कळतं. अन्नाची चव आणि प्रवासातील रोमांच यांचा एक अनोखा संगम या एपिसोडमध्ये अनुभवायला मिळेल.

    संपूर्ण एपिसोड नक्की पाहा!

    Welcome to a new episode of the 'Around The World' podcast!

    In this episode, host Neil Patil is in conversation with Amey Kadam. Amey is a multi-talented creator — a content creator, a skilled photographer, and a former contestant on Roadies 7. However, above all these roles, his heart lies in being a passionate foodie.

    This episode marks a special first, as food takes center stage right inside the studio for the very first time in the history of this podcast.

    For Amey, food is not just sustenance; it is a deep-rooted emotion. In this conversation, he takes us through his journeys — from the narrow bylanes of Maharashtra to the rugged terrains of Ladakh and Bhutan, and all the way to Australia.

    Beyond sightseeing, Amey shares how travel can become a life-changing experience. Join us as we explore the world through his lens of taste, adventure, and storytelling.
    Listen to the full episode now!

    Credits:
    Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.
    Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.
    Production House: Evertale Studios


    Más Menos
    1 h y 32 m