Around The World Podcast Por Veena World arte de portada

Around The World

Around The World

De: Veena World
Escúchala gratis

प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन्स टिक करणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, त्यांच्या गोष्टी, आणि परत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याप्रती मिळालेला एक नवीन दृष्टिकोन, हे सर्वकाही मिळून बनतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने आपला प्रवास.

हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'.
इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी.

ही सिरीज म्हणजे कुतूहल, संस्कृती आणि कनेक्शन्सचं सेलिब्रेशन… तेच जे आपल्या प्रवासाला खऱ्या अर्थाने महत्त्व देतं.

तर आपणही ह्या रोमांचक प्रवासाचा भाग नक्की बना!

------------------------------------------------------

Travel isn’t just about ticking destinations off a list; it’s about the people we meet along the way, the stories we carry back, and the fresh perspectives that stay with us.

With this thought, we are excited to bring you “Around The World”, our brand-new podcast series featuring some truly inspiring guests. From different walks of life, each of them has a story that goes beyond borders, stories of journeys, experiences, and what travel really means to them.

At its heart, this series is a celebration of curiosity, culture, and connections, the things that make travel so meaningful.

Stay tuned to be a part of this journey with us.Copyright Veena World
Ciencias Sociales Escritos y Comentarios sobre Viajes
Episodios
  • Episode 25 ft. RJ Dnyaneshwari (ज्ञानेश्वरी) | Around The World | Veena World
    Apr 10 2026
    आवाजाच्या दुनियेतून प्रवासाच्या जगात, एक वेगळाच प्रवास!या भागात आपण भेटतो एका रेडिओ जॉकी ज्ञानेश्वरीला, जिचा आवाज तुम्ही तासन्तास ऐकू शकता. पण तिच्या प्रवासाच्या कथा तुम्हाला अजून जास्त गुंतवून ठेवतात.

    एका १ तासाच्या शोमध्ये RJ नेमकं किती आणि कसं बोलतं? इथून सुरू झालेल्या या गप्पा आपल्याला घेऊन जातात गिरगावच्या गल्ल्यांमध्ये. तिथे बालपण, खाद्यसंस्कृती आणि ‘वाड्यां’वरून ओळखल्या जाणाऱ्या जागांची एक वेगळीच दुनिया आहे.

    आध्यात्मिक ठिकाणांपासून सुरू झालेला तिचा प्रवास, ट्रॅव्हल ब्रोशर्स गोळा करण्याची आवड, आणि इंटरनेटपूर्व व नंतर बदललेली प्रवासाची पद्धत, या सगळ्यांमधून एक सुंदर प्रवास उलगडतो. आज माहिती इतकी सहज उपलब्ध आहे की ‘surprise’ हरवत चाललंय. म्हणूनच ती सांगते की इंटरनेटवर जाण्यापूर्वी पुस्तकं वाचा. त्यामुळे कल्पनाशक्ती वाढते.

    बाली आणि हिमालयाबद्दलचं तिचं आकर्षण, पाँडिचेरी आणि हम्पी तिच्या wishlist मधील ठिकाणं, आणि पहिल्या foreign trip बद्दल कुटुंबाची असलेली भीती, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला तुमचाच एक भाग सापडेल. Monday ते Saturday काम करणाऱ्या RJ च्या आयुष्यात प्रवासासाठी वेळ कमी होता. पण आता ब्रेकमध्ये ती जग अजून जवळून अनुभवू इच्छिते. तुमचा favourite travel memory कोणता? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!


    From the world of radio to the world of travel, this is a journey worth listening to.

    In this episode, we sit down with a Radio Jockey whose voice you may have heard for hours, but whose travel stories will keep you even more engaged.

    Starting with what really goes into a one-hour RJ show, the conversation with RJ Dnyaneshwari takes us through her childhood in Girgaon. It explores its food culture, iconic joints, and the unique way places are named after “wadas.”

    Her travel journey began on a spiritual note. She collected travel brochures and dreamed of destinations long before the internet made everything accessible.

    Today, with information just a click away, she reflects on how we are losing the element of surprise. She believes that reading books before searching online helps build imagination.

    From her fascination with Bali and the Himalayas to her wishlist destinations like Pondicherry and Hampi, and even the anxiety around her first international trip, this episode is filled with relatable moments.

    With a demanding Monday-to-Saturday RJ schedule limiting her travel, she now looks forward to exploring the world more than ever during her breaks.

    What is your favorite travel memory? Tell us in the comments!
    Más Menos
    57 m
  • Episode 24 ft. Achyut Godbole (अच्युत गोडबोले) | Around The World | Veena World
    Apr 6 2026
    ज्ञान, जिज्ञासा आणि सतत शिकत राहण्याची भूक या सगळ्यांचा संगम असलेला हा खास भाग आहे.

    या भागात आपल्यासोबत आहेत प्रख्यात लेखक आणि विचारवंत Achyut Godbole. IT, गणित, विज्ञान, कला, संगीत, संस्कृती आणि मानसशास्त्र अशा विविध विषयांवर त्यांनी मांडलेले विचार या गप्पांमधून उलगडतात.

    लहानपणी १३ घरांमध्ये राहणं, IBM च्या इंटरव्ह्यूला पायजमा-बुशशर्टमध्ये जाणं, आणि सतत नवीन शिकत राहण्याची त्यांची वृत्ती या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रवासाला वेगळं बनवतात.

    Patni Computers आणि L&T मधील अनुभव, जगभरातील लोकांशी संवाद, आणि वाचनाची प्रचंड आवड यामुळे त्यांनी ७५ हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत.

    या भागातील एक महत्त्वाचा विचार असा आहे. AI नोकऱ्या काढून टाकणार नाही, पण AI जाणणारे लोक इतरांना मागे टाकतील.

    तंत्रज्ञानापासून ते प्रवास, खाद्यप्रेम आणि स्कॅन्डिनेव्हियन देशांबद्दलचं आकर्षण या सगळ्यामुळे हा भाग तुम्हाला विचार करायला भाग पाडेल.

    तुमचा biggest takeaway काय होता? कमेंट्समध्ये नक्की सांगा!


    This is a conversation about curiosity, learning, and staying relevant in a changing world.

    In Episode 24, we are joined by Achyut Godbole, whose insights span across IT, science, mathematics, art, music, and psychology.

    From living in 13 different homes to walking into an IBM interview in traditional attire, his journey reflects confidence, individuality, and a relentless drive to learn.

    With experience at Patni Computers and L&T, and a deep love for reading, he has authored over 75 books across diverse subjects.

    One powerful takeaway from this episode is simple. AI won’t replace people. But people who know AI will replace those who don’t.

    From technology to travel, and from food to philosophy, this episode is filled with perspectives that stay with you.

    What was your biggest takeaway? Tell us in the comments!
    Más Menos
    2 h y 19 m
  • Episode 23 ft. Leena Bhagwat (लीना भागवत) | Around The World | Veena World
    Mar 27 2026
    आपण एखादं नाटक पाहतो तेव्हा त्यामागची मेहनत दिसते, पण त्या पात्रांना जिवंत करण्यासाठी एक कलाकार जग कसं पाहतो?

    ‘वर्ल्ड थिएटर डे’च्या खास मुहूर्तावर, अभिनेत्री लीना भागवत यांनी उलगडलाय त्यांचा हा प्रवास!
    सुनीला पाटील यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी सांगितलं की त्यांना समुद्रकाठापेक्षा डोंगरांची शांतता का आवडते. अमेरिकेत टेस्लामध्ये बसण्याचा अनुभव असो किंवा नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांना भारत-पाकिस्तान सामन्याचा स्कोअर सांगणं—लीना ताईंचे हे अनुभव तुम्हाला कधी हसवतील तर कधी अंतर्मुख करतील.

    जुनी मंदिरं, कॉफीचा सुगंध आणि महाराष्ट्रातील गावकुसातील पर्यटन यावर रंगलेल्या या गप्पा नक्की पाहा.
    हा भाग प्रवासाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देणारा आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!


    Happy World Theatre Day!

    To celebrate, we have a very special guest who believes that every journey is a performance in itself, Leena Bhagwat.

    In Episode 23, she sits down with Sunila Patil to discuss why she prefers “slow travel” and how the sounds of the wind and birds help her craft her roles on stage.

    From her first Tesla ride in the USA to the discipline of international theatres, and her candid confession about fearing take-offs, Leena shares it all.

    Discover why she avoids network-heavy places and why a cup of coffee is her favorite welcome to a new country.
    Join us for a conversation that proves travel is the ultimate creative process!
    Let us know your favorite travel memory in the comments below!

    Credits:
    Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.
    Agency: @tillitclicks
    Production House: Evertale Studios
    Más Menos
    1 h y 7 m
Todavía no hay opiniones