Episodios

  • सोनवणी आणि वाद...
    Sep 3 2021

    संजय सोनवणी आणि वाद याचा फार जवळचा संबंध आहे... संजय उवाच सिरीजमध्ये  आतापर्यंत आपण लेखक, विचारवंत संजय सोनवणी यांची परखड मतं ऐकली... पण आजचा एपिसोड हा एकदम खास आहे... संजय सोनवणी यांनी आपली मतं मांडली, सोशल मीडियावर आपले विचार मांडले की हमखास कोणी ना कोणी त्याला विरोध दर्शवतं... या सगळ्या परिस्थितीवर सोनवणी यांची काय मतं आहेत, अशा विरोधाला ते कसे सामोरे जातात याचा आढावा घेतलाय थेट सोनवणी यांच्याकडून!

    Más Menos
    40 m
  • माझी हेरगिरी…
    Aug 27 2021

    गुप्तहेरांचं आयुष्य नक्की कसं असतं, त्यातही खाजगी हेर आपली ओळख बाहेर न येऊ देता कसे काम करतात, हेरांकडे कोणकोणत्या प्रकारच्या नैतिक-अनैतिक गोष्टींचा सुगावा लावण्याची मागणी येते, हेरांना आपली मूल्ये कशाप्रकारे सांभाळावी लागतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व स्वानुभव एकेकाळी हेरगिरी व्यवसायाचा अनुभव असलेले लेखक संजय सोनवणी यांनी दिली आहेत... 

    Más Menos
    41 m
  • तालिबान आलं, पुढे काय?
    Aug 20 2021

    सध्या जगभरात धगधगता विषय सुरू आहे, तो म्हणजे अफगाणिस्तान आणि तालिबान... तब्बल २० वर्षानंतर तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. यामुळे अफगाणिस्तानातल्या सामान्य जनतेवर सर्वात जास्त अत्याचार सुरू झाले आहेत... मात्र या सगळ्याला कारणीभूत कोण, अमेरिकेने आपले सैन्य का हटविले, अफगाणिस्तानचा वाली कोण, तेथील जनता पळ का काढत आहे, या सर्व प्रकारावर इतर देशांच्या प्रतिक्रिया काय अन् तालिबान आता अफगाणिस्तानात आले आहे, आता पुढे काय होणार? या सर्व जळजळीत प्रश्नांवर आपली सडेतोड उत्तरं दिली आहेत लेखक व विचारवंत संजय सोनवणी यांनी!

    Más Menos
    44 m
  • जमा-खर्च स्वातंत्र्याचा!
    Aug 13 2021

    भारताला स्वातंत्र्य मिळाले पण आपण खरोखरच स्व-तंत्र आहोत का? आजवरच्या प्रवासात आपण काय कमावले आहे नि काय गमावले आहे, आपण एक देश म्हणून कोणत्या बाबींवर आत्मचिंतन करायलाच पाहिजे यावर भाष्य करणारा, स्वातंत्र्याचा जमाखर्च मांडू पाहणारा ज्येष्ठ विचारवंत, लेखक संजय सोनवणी यांच्यासमवेत रंगलेला हा परखड संवाद.

    Más Menos
    38 m
  • नावांचा सोस कशाला?
    Aug 11 2021

    भारतात कोणतीही नवीन गोष्ट घडली, उभारली, तयार झाली की त्याला कोणा ना कोणा महान व्यक्तिचं नाव देण्यात येतं... मात्र, हे सोयीनुसार होणारं नामकरण कितपत योग्य आहे, यातही राजकीय हेतू असतो का, नामकरणाने त्या गोष्टीला, वास्तुला, पुरस्काराला कोणत्या दृष्टीने बघितलं जातं, नामकरण करताना समाजाचं मत गृहित घरलं जातं का या व अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उलगड लेखक, विचारवंत संजय सोनवणी यांनी या भागात केली आहे...

    Más Menos
    25 m
  • ईशान्य भारताचा गुंता कधी सुटणार?
    Aug 6 2021

    ईशान्य भारत, त्याकडे झालेलं दुर्लक्ष आणि तिथल्या बांधवांची देशाबद्दल असलेली मानसिकता हे विषय नेहमीच चर्चिले जातात. आसाम-मिझोरम सीमाभागात नुकत्याच झालेल्या पोलिस चकमकीमुळे ईशान्य भारत आणि तेथील एकूण परिस्थिती यावर पुन्हा एकदा माध्यमांनी भाष्य केलंय. मात्र, ईशान्य भारताबाबत दृष्टीकोन तयार करण्यासाठी माध्यमं किती जबाबदार आहेत, या परिस्थितीवर माध्यमांची भूमिका काय आणि सीमाभागाचा हा वाद नक्की काय आहे, हा गुंता कधी सुटणार अशा अनेक धगधगत्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत लेखक, विचारवंत संजय सोनवणी यांनी.

    Más Menos
    29 m
  • भारतीय राज्यघटनेची चिकित्सा व्हावी का?
    Jul 30 2021

    भारतीय संविधानाने सर्व भारतीयांना एका सूत्रांत बांधलंय. मात्र, घटना दुरूस्ती किंवा घटनेची चिकित्सा करायची वेळ आल्यास त्यावर अगदी टोकाच्या भूमिका व्यक्त होतात. देशाची घटना काळानुरूप बदलायला हवी का, घटनेतील कोणत्या कलमांचा समावेश हा नसता तर बरे झाले असते, जातीवाचक कायदे कसे इतरांना त्रासदायक ठरतात आणि आपली घटना सदोष आहे की नाही या व अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची बेधडक उत्तरं ऐका संजय सोनावणींकडून!

    Más Menos
    40 m
  • आरक्षण कसं जाईल?
    Jul 26 2021

    सध्या महाराष्ट्रातला धगधगता विषय म्हणजे ‘आरक्षण’. या आरक्षणामुळे कालांतराने जाती-जातींत, धर्मा-धर्मांत वादाची ठिणगी पडली आणि आता सगळेजण आरक्षण मागू लागलेत. अनेकांना असं वाटतंय की आरक्षण रद्द व्हावं, तर काही लोकांना आता नव्यानं आरक्षण हवंय. मात्र, ‘संजय उवाच’ सिरीजमधल्या या पॉडकास्टमध्ये आरक्षण जावं का, आरक्षण कसं जाईल, आरक्षण हा विषय कसा हातळला गेला पाहिजे, आरक्षणामुळे कोणाचं किती नुकसान झालं, आरक्षणामुळे कोणाचा किती फायदा झाला या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत लेखक विचारवंत संजय सोनवणी यांनी!

    Más Menos
    43 m

Los mejores audiolibros

Desde los favoritos de todos los tiempos hasta lo más popular ahora, hemos reunido los mejores audiolibros en todos los géneros.
¡Elige tu favorito, corre por nuestra cuenta! Solo para clientes nuevos. Se renueva automáticamente a US$14.95/mes después de 30 días. Cancela en cualquier momento.
adbl_web_global_use_to_activate_webcro805_stickypopup