Episodios

  • ....आणि एव्हरेट हळवा झाला!
    Jul 23 2023

    मुंबईतील शरद कुलकर्णी यांनी वयाच्या ६०व्या वर्षी जगातील सर्वात उंच पर्वतशिखर माउंट एव्हरेट केले. असे करणारे ते पहिले भारतीय ज्येष्ठ नागरिक ठरले. त्यांची जिद्द, ध्येयासक्ती यामुळे हे शक्य झाले असले तरी त्यांच्या या यशाला एक हळवी, वेदनामय किनार आहे. एव्हरेट शिखर सर करण्याच्या पहिल्या प्रयत्नांत त्यांना सोबत असलेल्या आपल्या प्रिय पत्नीस गमवावे लागले. पुन्हा जिद्दीने ते उभे राहिले आणि तिच्या स्मृतिंना उराशी जपत ही मोहीम फत्ते केली आणि तिचं तिथं स्मारकही रोवलं. थरारक, रोमांचक आणि तितकीच हळवी अशी ही एव्हरेट मोहीम कशी घडली, ऐकूया `संडे विथ् देशपांडे`च्या या विशेष भागामध्ये संतोष देशपांडे यांसमवेत खुद्द त्यांच्याच शब्दांत. प्रेरणादायी अशी ही दास्तान खुद्द एव्हरेस्टलाही हळवी करुन जाते. जरुर ऐका आणि इतरांनाही आवर्जून ऐकवा.

    Más Menos
    55 m
  • होय..प्राणी बोलतात!
    Jul 16 2023

    प्राण्यांशी आपण संवाद साधू शकतो का, त्यांच्या मनातलं कळू शकतं का? त्यांना आपल्या मनातलं सांगू शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारा संडे विथ् देशपांडे पॉडकास्ट मालिकेतील हा विशेष भाग. टेलिपॅथिक अॅनिमल कम्युनिकेशन हे तंत्र ज्यांना गवसले, असे लोक प्राण्यांशी संवाद साधू शकतात. या विषयातील तज्ज्ञ प्राणीप्रेमी पत्रकार उमा कर्वे चक्रनारायण यांना संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आणि उलगडत गेली अनेक गुपितं...ज कदाचित आपल्याला ठाऊक नव्हती. तुमच्या-आमच्या मनातील कुतूहल जागं करणारा आणि प्राण्यांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन विकसित करणारा हा इंटरेस्टिंग संवाद जरुर ऐका आणि सर्वांना आवर्जून ऐकवा.

    Más Menos
    46 m
  • सहा महिने, सहा दिवस- माझी नर्मदा परिक्रमा
    Jul 2 2023

    अध्यात्माशी जवळीक असणाऱ्या अनेकांसाठी नर्मदा परिक्रमा म्हणजे एक प्रकारचे स्वप्न. पुण्यातील प्रशांत चितळे यांनी बहुराष्ट्रीय कंपनीची नोकरी सोडून अध्यात्ममार्गात जाण्याचे ठरविले आणि त्याचाच पहिला टप्पा म्हणून पायी नर्मदा परिक्रमा केली. सहा महिने, सहा दिवस चाललेली ही नर्मदा परिक्रमा नेमकी कशी घडली, त्यात त्यांना आलेले अनुभव काय होते, त्यांची निरीक्षणे काय आहेत या व अशा अनेक गोष्टींची सहज उलगड करणारा `संडे विथ् देशपांडे`चा विशेष भाग. नर्मदा परिक्रमेविषयी उत्सुकता, आकर्षण आणि कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने जरुर ऐकावा असा हा संवाद नवं, वेगळं नि ताजं काही देऊन जातो.

    Más Menos
    1 h y 9 m
  • एक घास भुकेल्यांसाठी...
    May 21 2023

    ज्यांची पोटभर सोडा, एक वेळ जेवणाचीही भ्रांत असते अशा भुकेल्या लोकांचं जग तुम्ही कधी पाहिलंय? पुण्यातील कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे गिरीराज सावंत यांनी आपल्या मित्रांच्या मदतीनं फूड फॉर हंग्री अर्थात, भुकेल्यांसाठी घास हा उपक्रम सुरु केला, रोज शेकडो भुकेल्यांसाठी फूड पॅकेजेस् तयार करुन पोहोचविणारी यंत्रणा त्यांनी उभा केली आणि अनुभवांती एक विलक्षण वास्तव पुढं आलं... काय आहे, हे वास्तव? ज्यांना आपण भिकारी समजतो, त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत, इंग्रजी बोलणारेही उपाशी का राहात असतील, कोणत्या गोष्टींमुळे त्यांच्यावर ही वेळ आली, आपण समाज म्हणून नेमके कुठं कमी पडतोय या व अशा अनेक अंतर्मुख करणाऱ्या संवेदनशील प्रश्नांची मालिका मग सुरु होते. याचाच वेध घेणारा हा खास पॉडकास्ट जरुर ऐका, इतरांनाही ऐकवा आणि संवेदनशीलतेचा स्पर्श अनुभवा!

    Más Menos
    27 m
  • सेनगावकरांचं गुरुकुल
    Apr 11 2023

    महाराष्ट्र पोलिस दलातील एक कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटविणारे राज्याचे निवृत्त विशेष पोलिस महासंचालक श्री. रवींद्र सेनगावकर हे अत्यंत वेगळ्या पठडीतील व्यक्तिमत्व. सेवानिवृत्तीनंतर सुखनैव आराम करण्याचा पर्याय असतानाही, त्यांनी राज्यातील तरुणांना पोलिस व प्रशासकीय सेवेसाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धीकदृष्ट्या तयार करण्यासाठी गुरुकुल पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे ठरविले आणि त्यांचे हे स्वप्न आता सत्यात उतरले आहे. सेनगावकर गुरुकुल फाउंडेशनचे कार्य सुरु झाले. त्यांची नेमकी ही काय संकल्पना आहे, त्यातून ते काय साध्य करु पाहाताहेत, अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना त्यांना काय सांगावेसे वाटते या सर्व बाबींची उलगड खुद्द सेनगावकरांनीच संतोष देशपांडे यांसमवेतच्या या पॉडकास्टमधून केली आहे.

    Más Menos
    44 m
  • राज्यगीतातून गौरवलाय...महाराष्ट्र माझा!
    Apr 1 2023

    महाराष्ट्राला अखेर राज्यगीत मिळाले. गेली ६३ वर्षे मराठी माणसाला प्रेरणादायी ठरणारं, अनोखं चैतन्य जागवणारं `जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा` हे गीत आता राज्यगीत म्हणून बहाल झालं आहे. असं काय आहे या गीतात, जे तुमच्या-आमच्या मनातील मराठी बाणा व्यक्त करतं? देशाप्रति असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करुन देतं, याविषयी दस्तुरखद्द महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना काय वाटतं याची उलगड करणारा हा स्पेशल पॉडकास्ट...खास तुमच्यासाठी! जरुर ऐका आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा.

    Más Menos
    10 m
  • अमेरिकन खासदार..श्री ठाणेदार
    Mar 4 2023

    अमेरिकेतील पहिले मराठी खासदार म्हणजे श्री ठाणेदार. जितके उमदे व्यक्तिमत्व, तितकेच विनम्र...विचारी आणि सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत. असे हे श्री ठाणेदार, ज्यांनी अमेरिकेत जाऊन शून्यातून स्वतःचे उद्योगविश्व उभारले, आता मिशिगनसारख्या मोठ्या राज्यातून ते अमेरिकन कॉंग्रेसमन (खासदार) बनले आहेत. त्यांचा हा सार्वजनिक, राजकीय जीवनातील प्रवास जाणून घेतानाच त्यांचे विचार, अमेरिकेतील आणि भारतीय शिक्षणपद्धत, रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-भारत संबंधांत झालेले बदल अशा विविध विषयांवर ठाणेकर यांचे विचार प्रत्येकानेच ऐकावे असे आहेत. एक अत्यंत वेगळा पॉडकास्ट, जो आपल्या विचारांना गती देईल, नवी सकारात्मकता रुजवेल....जरुर ऐका.

    Más Menos
    38 m

Los mejores audiolibros

Desde los favoritos de todos los tiempos hasta lo más popular ahora, hemos reunido los mejores audiolibros en todos los géneros.
¡Elige tu favorito, corre por nuestra cuenta! Solo para clientes nuevos. Se renueva automáticamente a US$14.95/mes después de 30 días. Cancela en cualquier momento.
adbl_web_global_use_to_activate_webcro805_stickypopup