Sunday with Deshpande (Season2) Podcast Por Santosh Deshpande arte de portada

Sunday with Deshpande (Season2)

Sunday with Deshpande (Season2)

De: Santosh Deshpande
Escúchala gratis

OFERTA POR TIEMPO LIMITADO | Obtén 3 meses por US$0.99 al mes

$14.95/mes despues- se aplican términos.
आपला भवताल अनेकांच्या अनुभवांच्या परिघात फिरत असतो. म्हणूनच, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात, आचार-विचारांत, त्याच्या संकल्पनेत एक विलक्षण गोष्ट दडलेली असते. काही गुपितं दडलेली असतात आणि आयुष्याला जिंदादिल करु पाहणारी नवी दृष्टीही दडलेली असते. संडे विथ् देशपांडे या पॉडकास्टमधून अशाच व्यक्तींसमवेत संतोष देशपांडे यांची संवादाची झकास मैफल रंगते आणि तुम्हाला आयुष्यावर आणखी प्रेम करायचं शिकवते. रविवार आवडणाऱ्या प्रत्येकासाठी केव्हाही ऐकता येईल अशी पेशकश.© Santosh Deshpande Arte Economía Gestión y Liderazgo Historia y Crítica Literaria Liderazgo
Episodios
  • ....आणि एव्हरेट हळवा झाला!
    Jul 23 2023

    मुंबईतील शरद कुलकर्णी यांनी वयाच्या ६०व्या वर्षी जगातील सर्वात उंच पर्वतशिखर माउंट एव्हरेट केले. असे करणारे ते पहिले भारतीय ज्येष्ठ नागरिक ठरले. त्यांची जिद्द, ध्येयासक्ती यामुळे हे शक्य झाले असले तरी त्यांच्या या यशाला एक हळवी, वेदनामय किनार आहे. एव्हरेट शिखर सर करण्याच्या पहिल्या प्रयत्नांत त्यांना सोबत असलेल्या आपल्या प्रिय पत्नीस गमवावे लागले. पुन्हा जिद्दीने ते उभे राहिले आणि तिच्या स्मृतिंना उराशी जपत ही मोहीम फत्ते केली आणि तिचं तिथं स्मारकही रोवलं. थरारक, रोमांचक आणि तितकीच हळवी अशी ही एव्हरेट मोहीम कशी घडली, ऐकूया `संडे विथ् देशपांडे`च्या या विशेष भागामध्ये संतोष देशपांडे यांसमवेत खुद्द त्यांच्याच शब्दांत. प्रेरणादायी अशी ही दास्तान खुद्द एव्हरेस्टलाही हळवी करुन जाते. जरुर ऐका आणि इतरांनाही आवर्जून ऐकवा.

    Más Menos
    55 m
  • होय..प्राणी बोलतात!
    Jul 16 2023

    प्राण्यांशी आपण संवाद साधू शकतो का, त्यांच्या मनातलं कळू शकतं का? त्यांना आपल्या मनातलं सांगू शकतो का? अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारा संडे विथ् देशपांडे पॉडकास्ट मालिकेतील हा विशेष भाग. टेलिपॅथिक अॅनिमल कम्युनिकेशन हे तंत्र ज्यांना गवसले, असे लोक प्राण्यांशी संवाद साधू शकतात. या विषयातील तज्ज्ञ प्राणीप्रेमी पत्रकार उमा कर्वे चक्रनारायण यांना संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आणि उलगडत गेली अनेक गुपितं...ज कदाचित आपल्याला ठाऊक नव्हती. तुमच्या-आमच्या मनातील कुतूहल जागं करणारा आणि प्राण्यांकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन विकसित करणारा हा इंटरेस्टिंग संवाद जरुर ऐका आणि सर्वांना आवर्जून ऐकवा.

    Más Menos
    46 m
  • सहा महिने, सहा दिवस- माझी नर्मदा परिक्रमा
    Jul 2 2023

    अध्यात्माशी जवळीक असणाऱ्या अनेकांसाठी नर्मदा परिक्रमा म्हणजे एक प्रकारचे स्वप्न. पुण्यातील प्रशांत चितळे यांनी बहुराष्ट्रीय कंपनीची नोकरी सोडून अध्यात्ममार्गात जाण्याचे ठरविले आणि त्याचाच पहिला टप्पा म्हणून पायी नर्मदा परिक्रमा केली. सहा महिने, सहा दिवस चाललेली ही नर्मदा परिक्रमा नेमकी कशी घडली, त्यात त्यांना आलेले अनुभव काय होते, त्यांची निरीक्षणे काय आहेत या व अशा अनेक गोष्टींची सहज उलगड करणारा `संडे विथ् देशपांडे`चा विशेष भाग. नर्मदा परिक्रमेविषयी उत्सुकता, आकर्षण आणि कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने जरुर ऐकावा असा हा संवाद नवं, वेगळं नि ताजं काही देऊन जातो.

    Más Menos
    1 h y 9 m
Todavía no hay opiniones