Episodios

  • # 1828: "जोखू भुताची गोष्ट". लेखक : गौरी देशपांडे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Aug 8 2025

    Send us a text

    त्या छोट्याशा मुलीच्या मैत्री मुळे जोखू भुतमध्ये किती मोठा बदल झाला होता! मैत्री ही एक जादूच असावी, नाही का? दुष्टातल्या सुष्टाला बाहेर काढू शकणारी, निराशेला आशेमध्ये बदलू शकणारी, रडणाऱ्याला हसवू शकणारी आणि राक्षसालासुद्धा माणूस बनवू शकणारी !

    आणि हो! ती लहानगी जोखूच्या भीतिदायक आवाजाला किंवा रूपाला घाबरली नाही त्यामुळे जोखू भूताची ‘भयकथा’ अपयशी ठरली !

    Más Menos
    8 m
  • "तोरण्याच्या गुहेतील वाघ आणि वाघीण" लेखक : मनोज कापडे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Aug 7 2025

    Send us a text

    इंग्रज लेखक जेम्स डग्लस याने तोरणा म्हणजे गरुडाचे घरटेच आहे असे गौरवाने लिहून ठेवले आहे.

    ह्या तोरण्याच्या जंगलात सखुबाई आणि रामभाऊ हे वाघ आणि वाघीण राहतात. मुलांच्या शिक्षणासाठी सुखाचा त्याग आणि श्रमाची परिसीमा गाठून यांचा संसार आता प्रगतीच्या प्रकाशाने लखलखतो आहे. एका शेतकरी कुटुंबाची मनाला चटका लावणारी ही कहाणी!

    Más Menos
    6 m
  • "नऊ वर्षानंतर ची ‘जाग‘!" लेखिका : आरती कदम. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Aug 6 2025

    Send us a text

    नऊ वर्षांनंतरची 'जाग'!

    नऊ वर्ष ती आपल्याच बिछान्यात ७० पेक्षा जास्त पुरुषांचा बलात्कार सहन करत होती आणि तिला त्याची सुतराम कल्पना नव्हती...

    पण तिला भान आणणारी 'ती' घटना घडली आणि सुरू झाली न्यायालयीन लढाई... आपल्याच नवऱ्याविरुद्धची आणि बलात्काराच्या कायद्यातील बदलासाठीची... बाईच्या सन्मानासाठीची !

    त्या जीझेल पेलिकॉ यांना नुकताच फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'लीजिआँ ऑफ ऑनर' देण्यात आला. त्यानिमित्ताने...


    Más Menos
    13 m
  • # 1825: काऊ-चिऊची पिल्ले. लेखिका : सुजाता लेले. कथन:( मीनल भडसावळे )
    Aug 5 2025

    Send us a text

    लहानपणापासून मुलांना आपण काऊ- चिऊच्या गोष्टी सांगतो. त्यातूनच त्यांचे संवेदनाक्षम मन निसर्गाकडे जाऊ लागते . ह्या सुंदर गोष्टीचा निसर्गाच्या माध्यमातून आढावा घ्यायचा प्रयत्न.

    Más Menos
    4 m
  • "सारथी". लेखक : राजेश्वर शेळके. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Aug 4 2025

    Send us a text

    रस्त्या वरच्या प्रवासात आपल्याला कधी कधी अशी माणसं भेटतात, जी फक्त आपली गाडी चालवत नसतात तर ते आपल्या जीवाचं रक्षणही करत असतात. त्यांची नजर रस्त्यावर असते, पण मन सतत आपल्या सुरक्षेवर. पण दुर्दैवाने, आपण त्यांचा अनुभव दुर्लक्षित करतो.

    आणि मग रस्त्यावरचा तो प्रसंग आपल्याला चांगलाच धडा शिकवतो!

    Más Menos
    4 m
  • "ज्योतिषाच्या नादाने झाली, प्रपंचाची राखरांगोळी". लेखिका: ॲड . रंजना पगार गवांदे. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Aug 3 2025

    Send us a text

    ज्योतिष सांगण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीच्या गोड बोलण्याला फसून संपूर्ण कुटुंब त्याच्या कह्यात जाते, ही खोटी वाटत असली तरी सत्य घटना असू शकते हे लता-गोविंदच्या कुटुंबाचे निघालेले वाभाडे ऐकल्यावर पटतं. मात्र घरातला एक जरी माणूस विचारी असेल तर ते घर खूप काही सोसूनही पुन्हा उभं राहू शकत त्याचीच ही कहाणी.

    Más Menos
    11 m
  • # 1822: अमवेल्ट (Umwelt). ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Aug 2 2025

    Send us a text

    'द ट्रुमन शो' हा एक प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट आहे. ही ट्रुमन बरबँक नावाच्या एका माणसाची कथा आहे, जो एक सामान्य आणि आनंदी जीवन जगतो. तो सीहेवन नावाच्या एका सुंदर, शांत आणि परिपूर्ण शहरात राहतो. त्याचे मित्र आहेत, त्याची पत्नी आहे आणि एक चांगली नोकरी आहे. पण त्याला एक गोष्ट माहीत नसते - त्याचे संपूर्ण आयुष्य एक असत्य किंवा काल्पनिक आहे. तो जन्मापासून एका विशाल स्टुडिओमध्ये (जो शहरासारखा दिसतो) राहत आहे आणि त्याचे आयुष्य हा २४ तास चालणारा, जगभरात प्रसारित होणारा एक प्रचंड लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो आहे.
    या चित्रपटातील नायकाप्रमाणेच, "आपल्यासमोर जे जग सादर केले जाते, तेच आपण वास्तव म्हणून स्वीकारतो." आपणही आपापल्या 'अमवेल्ट' स्वीकारतो आणि तिथेच थांबतो.

    Más Menos
    14 m
  • # 1821: एक्सपायर होण्यापूर्वीच आउटडेटेड. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Aug 2 2025

    Send us a text

    "अगं पण दुधातलं कॅल्शियम त्याला मिळतं का?" हा प्रश्न तर एकदम चक्रावून टाकणारा आहे..
    म्हणजे आदिमानवापासून जे जे फक्त दूध पीत आलेत ते सगळे वेडे.. आणि त्यात हॉर्लीक्स मिसळणारेच तेवढे हुशार!! ह्यांनाच फक्त दुधातलं कॅल्शियम मिळतं..
    ... आणि वर, मुन्ने का हॉर्लिक्स अलग, मुन्ने की मम्मी का अलग, और मुन्ने के पापा का अलग...

    Más Menos
    6 m