Episodios

  • Episode 499 as on 17th April 2026
    Apr 17 2026

    Guru Shishya Sukhaanandsamwad as on 17th April 2026

    सुप्रभात, ॐ असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय । मृत्योर्मा अमृतंगमय । ॐ शांतिः शांतिः शांति: ॥

    प्रभूंबरोबरचा हा मायेपासून सत्यापर्यंतचा, अंधारापासून प्रकाशापर्यंतचा मृतापासून अमृतापर्यंतचा एकूणच अशाश्वतापासून शाश्वतापर्यंतचा असा आनंददायी प्रवास . जय परमानंद प्रिय परमानंद गोविंद परमानंद 🙏🙏🙏

    Más Menos
    1 h y 7 m
  • Episode 498 as on 14th April 2026
    Apr 14 2026
    Guru Shishya Sukhaanandsamwad as on 14th April 2026देवावरती प्रेम जडले। देवप्रेमे जीवन घडले। जीवनातल्या अनुभवलेल्या आनंदा गातो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥ भाऊंच्या घरी नियमीत येत असलेल्या अन्य काही मंडळींचा उल्लेख मागल्या एपिसोडमध्ये अनावधानाने करायचा राहून गेला. सत्यविजय रेवाळे , प्रमोद , शारदाताई ,वीणा ठाकरे परिवार , अंजली , मधुरा कुलकर्णी ही मंडळी सुध्दा येत असत . पुढे पुढे सौरभ , मुद्रा , वंदनाजी कपूर सुध्दा यायला लागले . शहापूरची मंडळीही काही दिवस येत होती. हा परमानंद प्रभूंच्या प्रेमाचा गोतावळा होता. भाऊ व सरोजवहिनी अत्यंत प्रेमाने सर्वांचे स्वागत करत असत .बरोबर 7.00 वाजता प्रभूंच्या जयजयकाराने कार्यक्रमाला सुरुवात होत असे. प्रभूंच्या प्रतिमेला व पादुकांना भाऊंनी पुष्पहार घालून वंदन केल्यावर स्तोत्रगायन होत असे. भाऊ सर्वांनाच सामावून घेत असत. दोघा तिघांना पदगायनाची संधी मिळत असे. पदगायनाची सांगता मात्र नेहमी सत्यविजय रेवाळ्यांच्या गोड आवाजात होत असे. त्यानंतर एखाद्या प्रेमीभक्ताचे भावपूर्ण मनोगत. हा सगळा क्रम ठरलेला असायचा. प्रभूंचे माहात्म्य माझ्या ह्रदयात ठसण्यामध्ये या प्रेमीभक्तांच्या प्रकटीकरणाचे फार मोठे योगदान आहे. प्रेमाने रंगलेल्या भाविकांचा थोडासा रंग मलाही लागलाच . विषय तो एकच नारायण. इथे आदानप्रदान विचारांचे नव्हते तर प्रभूंविषयीच्या प्रत्येक प्रेमीभक्ताच्या भावाचे व प्रेमाचे होते . भाऊंचे निरूपण म्हणजे षडरस भोजनाची मेजवानीच. समर्पित जीवनाचा अद्भूत आविष्कार. विविध प्रभूप्रेमरंगांनी फुललेले व विस्तारलेले कारंजे ज्याचे मूळ भाऊंच्या अंतःकरणात होते . त्या कारंजाचे तुषार माझ्याही अंगावर पडायचे हा एक आनंददायी अनुभव होता. प्रभू हाच एकमेव विषय पण तो दरवेळेस नित्य नाविन्याने प्रकट व्हायचा. प्रभूंचा प्रदीर्घ सहवास, प्रत्येक बर्‍यावाईट प्रसंगात प्रभूंना दिलेली साथ , प्रभूंवरील असीम श्रध्दा , निष्ठा व सर्वांगाने असलेले प्रेम व या सर्व गुणधर्मातून उद्भावलेले प्रभूमय जीवन भाऊंच्या शब्दा शब्दातून उलगडत असे. भाऊंकडून प्रकट होत असलेले प्रभूमाहात्म्य माझ्या उमेदवारीच्या काळात मला प्रेरणादायी ठरत होते . म्हणूनच त्या काळात अनुभवलेल्या आनंदाचे गायन आजही माझ्याकडून ...
    Más Menos
    1 h y 9 m
  • Episode 497 as on 10th April 2026
    Apr 10 2026

    Guru Shishya Sukhanandsamwad as on 10th April 2026

    सहवासात प्रेमप्रसंग। घडला देवप्रेमसंग। स्मृतीतल्या जपलेल्या प्रेमा प्रगटवितो । आनंदासी घेतो , प्रेमे आनंदासी घेतो ॥


    भाऊंकडे जा असे प्रभूंनी सुचविले आणि पुढल्याच शनिवारपासून मी भाऊंकडे जायला सुरुवात केली. परमेश्वर, पाटणकर दांपत्य , खेर दांपत्य, पंडीत दांपत्य तसेच चंद्रकांत ओहळ , सुधा राठोड ही मंडळी आधीपासूनच येत होती . दत्तपीठात प्रभूंचे तेजोवलय असे तर इथे भक्तिमय वातावरण. प्रभू प्रत्यक्ष उपस्थित नसताना मंडळी विलक्षण भावपूर्णतेने प्रभू माहात्म्य व गुणगायन करीत असत . प्रत्येकाच्या जीवनात प्रारंभीच्या काळात असलेली प्रभूंची प्रमुख भूमिका पुढे एकमेव भूमिका कशी होत गेली याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख येत असे. प्रत्येकाला आलटूनपालटून भाव व्यक्त करण्याची संधी मिळत असे. माझ्याकडील कार्यक्रमात व भाऊंकडील कार्यक्रमात एक मूलभूत फरक मला जाणवला की माझ्याकडे जी काही मंडळी येत असत ती प्रभूंशी तशी जोडली गेलेली नव्हती आणि इथे तर बहुतेक सर्वजण प्रभूंचे प्रेमीभक्तच. अपवाद म्हणून नाही म्हणायला

    क्वचित कधीतरी एखादी त्रयस्थ व्यक्ती असायची. परिणामी जमलेल्या सर्व मंडळीचा प्रभूप्रेमाचा एकच सूर एकच स्वर एकच ताल तुझाचि जयजयकार देवा तुझाचि जयजयकार. या भारित वातावरणामुळे प्रभू प्रेममाहात्म्य मनात व अंतःकरणात ठसत गेले. मंगळवार, गुरुवारला आता पूरक अशी शनिवारची जोड मिळाली होती मंगळवारचा प्रभूंशी संवाद, गुरुवारचे प्रभूंचे निरूपण व

    शनिवारचे भाऊंसह प्रेमीभक्तांचे भावपूर्ण हृदगत असा तिन्ही अंगांनी आयुष्याकडे पहाण्याचा व आत्मचिंतनाचा एक नवीन दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रवास सुरू झाला होता . आनंदासी घेतो प्रेमे ... श्रीपरमानंदार्पणमस्तु

    Más Menos
    1 h y 14 m
  • Episode 496 as on 7th April 2026
    Apr 7 2026

    Guru Shishya Sukhanandsamwad as on 7th April 2026

    देवापासी करून मोकळे। अंतर प्रेमे भरूनी घेतले। अंतरातल्या दाटलेल्या प्रेमा वाहवितो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥

    देवाला आधी प्रभूंच्या अंतःकरणात शोधायचे म्हणजे नक्की काय करायचे हे कळत नव्हते. मनोविजय ग्रंथाचे दोनदा पारायण झाले होते. रे मना देहाशी न खेळता आत्म्याशी खेळ असे अवधूतप्रभूंनी म्हणून ठेवले होते. मी देह नाही मी आत्मा आहे पण देहरूपाने जीवन जगत आहे ही माया असली तरी वस्तुस्थिती होती . आत्मरूपाने जीवन कसे जगायचे ? सगळचं डोक्यावरून जात होते. प्रभू आत्मज्ञानी आहेत आणि सगुण रूपाने साकार आहेत म्हणून त्यांचा सहवास व त्यांच्याशी संवाद म्हणजेच आत्म्याबरोबरचा खेळ का ? मन पूर्णपणे मोकळे होत नव्हते . पण एक गोष्ट मात्र नक्की होती . मन प्रभूंकडे धावत होते . योग्य अयोग्य मज ना ठावे । मन माझे ते तुजकडे धावे . दृष्टीत परिवर्तन घडत होते पण प्रभूंच्या अंतःकरणाचा वेध कसा घ्यावा हे कळत नव्हते.

    माझी ही कुचंबणा प्रभूंच्या लक्षात आली. आता या मार्गात एक नवीन वळण येऊ घातले होते. प्रभूंच्या अंतःकरणाचा वेध घेण्याची दृष्टी प्राप्त करून घ्यायची असेल तर ज्यांची दृष्टी परिपक्व झाली आहे अशा मातब्बर भक्तांचा सहवास घडणे आता आवश्यक होते. मतिमंद तो साधनायोग्य झाल्यावर पुढील साधना करण्यासाठी दत्तपीठाला पूरक असे योग्य स्थान म्हणजे भाऊंचे पादुकामंदिर होते. भाऊंच्या शुध्द अंतःकरणातून मुखावाटे घडणाऱ्या प्रभूगुणसंकीर्तनातून माझ्याठायी प्रभूंच्या अंतःकरणाचा ध्यास लागण्याची शक्यता निर्माण होईल याची प्रभूंना खात्री होती. आणि म्हणून त्यांनी सुचविले की आता घरी कार्यक्रम न करता भाऊंकडे शनिवारी जात रहा. शिल्पकार मूर्ती घडवताना अनेक प्रयोग करत असतो . माझा जीवनप्रवासात एक नवीन अध्याय सुरू होत होता . आनंदासी घेतो प्रेमे ... श्रीपरनंदार्पणमस्तु.

    Más Menos
    1 h y 11 m
  • Episode 495 as on 3rd April 2026
    Apr 3 2026

    Guru Shishya Sukhanandsamwad as on 3rd April 2026

    देवाच्या त्या प्रेमासाठी। घडल्या देवप्रेमभेटी। भेटीतल्या साठवलेल्या प्रेमा दाखवितो । देवाचे या प्रेम घेऊनी देवासी अर्पितो ॥


    मनोविजय ग्रंथाचे वाचन चालू होते. मनाची शते वाचता वाचता मनाचे दोष जायच्या आधी दृष्टीवरील मळभ दूर व्हायला सुरुवात झाली होती. मनाचे दोष दिसायला लागले होते. मनोविजय ग्रंथ वाचनाचा मोठ्यात मोठा लाभ झाला असेल तर दृष्टी सुधारायला लागली होती व दोषांची जाणीव व्हायला लागली होती . अर्थात केवळ जाणीव झाल्याने दोष जातात असे नव्हे पण मन आता साधना करण्यास योग्य असे होऊ घातले होते व काय साधायचे आहे याची थोडीफार कल्पना आली होती.


    द्रोणाचार्यांनी अर्जुनाला लक्ष्यावर बाण सोडण्यास संमती दिली कारण अर्जुन आता साधनायोग्य झाला होता. संमती देण्यापूर्वी अर्जुनाच्या दृष्टीतील दोष दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता व दृष्टी साफ होईपर्यंत त्यांनी संयम बाळगला होता . अर्जुनाला फक्त लक्ष्य दिसायला लागले व इतर गोष्टी दिसेनाशा झाल्या ही दृष्टी बदलल्याची खूण होती . संकेत होता. मतिमंद ते साधनायोग्य होती. भूमी तयार झाली होती. बीज रोवण्याचा शुभसमय आला होता .आता लक्ष्य गाठायचे आहे. अर्जुना , चल उचल ते धनुष्यबाण आणि वेध घे त्या लक्ष्याचा, द्रोणाचार्यांनी आज्ञा केली.


    मनोविजयाच्या माध्यमातून प्रभूच मार्गदर्शन करत होते.मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ही सुरुवात होती. ग्रंथ संपत आला तसे प्रभू कुठे निर्देश करत आहेत हे लक्षात यायला लागले होते. भक्तिमार्गाने वाटचाल करत शोध कशाचा घ्यायचा ? वसे हृदयी देव तो कोण कैसा । पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा ॥ या प्रश्नापर्यंत प्रभूंनी मला आणले होते. प्रापंचिक दृष्टी लोप पावत होती व पारमार्थिक दृष्टीचा उदय होत होता. मनोविजय ग्रंथाची ही फार मोठी उपलब्धी होती . प्रभूंच्या प्रयत्नाला यश येत होते . अर्जुना तू जाण रे ।होसी बा सुजाण रे । विश्व नाही मीच आहे। सखया तुझी आण रे ॥ अर्जुना तू जाण रे ।

    देवाला आधी प्रभूंच्या अंतःकरणात शोधायचे आहे . माझ्याच अंतःकरणात प्रभूंना पहायची दृष्टी यायला अजून अवकाश होता .

    देवाचे या प्रेम घेऊनी .. श्रीपरमानंदार्पणमस्तु .

    Más Menos
    1 h y 5 m
  • Episode 494 as on 31st March 2026
    Mar 31 2026
    Guru Shishya Sukhanandsamwad as on 31st March 2026 देवाचे या प्रेम घेऊनी देवासी अर्पितो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता आम्ही श्रीभवानंदस्वामी यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जमलो. आम्ही चौघे नव्याने सुसंस्कारित प्रेमीजन तसेच अन्य काही मंडळी उपस्थित होती . भाऊंनी सर्वांचे स्वागत केले व प्रभूंनी प्रास्ताविक केले. त्या छोटेखानी निवेदनातून प्रभूंनी पुढील कार्याची दिशा स्पष्ट केली. एव्हाना मला अंदाज यायला लागला होता. माझ्या मनात विचार येत होते कार्य आता केवळ चर्चेपुरतं मर्यादित रहाणार नाही . कार्याला निश्चित असे कारण असायला हवे . कार्य जीवनोन्मुख झाले तरच जीव जीवभावापासून अलिप्त होईल व मनाचा कल ईश्वराभिमुख होण्याची शक्यता निर्माण होईल . मी असा विचार करत असताना अनपेक्षितपणे प्रभूंनी मला थोडक्यात बोलायला सांगितले . मी प्रभूंनी गुरुमंत्राचा संस्कार केला व नुसता संस्कारच नाही तर तीन टोकांच्या त्रांगड्यामधून सुटका केली म्हणून कृतज्ञता व्यक्त केली. आता मी आणि प्रभू अशी दोनच टोके उरल्यामुळे माझा मार्ग आता प्रशस्त, सुगम व सुकर झाला होता . भाव एकदिशीय करणे आता सुलभ होणार होते . दरम्यान आणखी एक विशेष घटना घडत होती. महाराज असल्यापासून दत्तपीठामध्ये दत्तप्रभूंच्या पादुका प्रतिष्ठापित होत्या. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर परमानंदस्वामींनी त्या पादुकांची स्थापना त्यांचे परमभक्त व परमस्नेही श्रीभवानंदस्वामी यांच्या निवासस्थानी प्रस्थापित केल्या.हा एक विलक्षण दुग्धशर्करा अमृतयोग होता. भाऊंच्या दृष्टीने तर परमभाग्य उदयास आले होते . कृपये परमानंद फळे. भाऊ कृतकृत्य झाले होते व आपल्या भावपूर्ण मनोगतातून त्यांनी प्रभूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली . भाऊंचे निवासस्थान आता पादुकामंदिर झाले होते. या मंदिरातच आता प्रभूंचे गुणगायन अनवरत होणार होते . भविष्य काळात मलाही त्याचा लाभ होणार होता . कार्यक्रमाचा समारोप प्रभूंच्या निरूपणाने झाला . " आतापर्यंत कार्य घडत राहिले पण त्याचा नेमका कुणाला काय लाभ झाला याचा कधी विचार आपण केला आहे का ? जे काही घडत गेले त्याला कार्य तरी कसे म्हणावे ? कार्य तेच जे बुध्दीला प्रगल्भ करते . शुध्द व निश्चयात्मक ...
    Más Menos
    1 h y 16 m
  • Episode 493 as on 27th March 2026
    Mar 27 2026
    Guru Shishya Sukhanandsamwad as on 27th March 2026देवप्रेम असे एक थोर भारी ।अनुभवाने ते जाणवे अंतरी ।त्या प्रेमाविण अन्य मी नेणिले -। देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥ त्या वर्षी गुरुपौर्णिमा गुरुवारीच होती. 2001 का 2002 साल असावे. प्रभूंनी सकाळी आम्हा चौघांवर गुरुमंत्राचा संस्कार करण्याचे योजिले होते. मी विचार करत होतो. उपासना मंत्राच्या संस्काराच्या पाठोपाठ लगोलग गुरुमंत्राचा संस्कार करण्याची उर्मी प्रभूंना का बरे आली असावी ? दत्तपीठात काहीतरी वेगळ घडतयं असे जाणवत होते पण नेमके काय घडतयं ते कळत नव्हते. मात्र प्रभूच्या चेहर्‍यावर एक प्रकारे निश्चयात्मकता दिसत होती. प्रभूंप्रती दृढ श्रध्दा होती व जे घडेल ते चांगलेच घडेल असा विश्वास होता. नामकरण विधीचे सोपस्कार पूर्ण झाले . प्रभूंनी त्यांच्या छोट्याशा निवेदनात गुरुसंस्काराचे व शिष्यभावाचे महत्व समजावून सांगितले. " " पूर्वी शिष्य सद्गुरूंच्या शोधात असत . आता असे शिष्य दुर्मीळ आहेत म्हणून सद्गुरूच पुढाकार घेऊन संस्कार करतात. गुरूशिष्य नात्यातून गुरूशिष्य संबंध निर्माण होणे महत्वाचे. जसजसे हे संबंध घट्टहोत जातील तसतसा शिष्यभाव दृढ होत जाईल. यास्तव सद्गुरूंना जीवनात केवळ प्राधान्यच नाही तर संपूर्ण शरण जाऊन आपले जीवन समर्पित करणे हेच स्वधर्माचरण होय. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणम् व्रज . तुम्हाला चौघांवर आनंदस्वामी म्हणून एकत्रितपणे संस्कार झाला आहे. म्हणून प्रत्येकाचे जरी स्वतंत्र आध्यात्मिक बारसे झाले असले तरी त्या नामांमध्ये एक समान सूत्र आहे व म्हणून परस्परांचे हात हातात घेऊन व सलोख्याचे संबंध राखत सर्वांनी एकदिलाने ते संयुक्त सूत्र सार्थ करायचे आहे " प्रभूंचे निवेदन झाल्यावर अल्पोपाहार झाला व आम्ही निघालो . एवढ्यात प्रभूंनी मला गॅलरीत बोलावून घेतले. " आज संध्याकाळी गुरुपौर्णिमेचा मोठा कार्यक्रम हाॅलमध्ये नाहीए . पण भाऊंकडे भेटून पौर्णिमा साजरी करून या. भाऊंकडून पत्ता घ्या . आपण 6.00 वाजता भेटू या . " मी हो म्हटलं आणि निघालो. पण मनात विचारचक्र सुरू झाले. नक्की काय घडतयं याचा अंदाज येत नव्हता . इतर कोणाशी चर्चा करण्याचा प्रश्न नव्हता आणि आता प्रभूंचेच सांगणे माझ्याकरता प्रमाण व अंतिम असल्यामुळे तशा चर्चेची आवश्यकताही नव्हती. अर्थात ...
    Más Menos
    1 h y 14 m
  • Episode 492 as on 24th March 2026
    Mar 24 2026
    Guru Shishya Sukhanandsamwad as on 24th March 2026देवप्रेमगुण असे आनंदाचा । स्वये घेऊनिया सर्वांसी देण्याचा। त्या प्रेमगुणासी अंगी मी बाणिले। देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥गर्गेस्वामींच्या फार्महाऊसवर सुंदरवन वृंदावनात प्रभूंच्या उपस्थितीत मकरसंक्रांतीचा कार्यक्रम दरवर्षी नित्यनेमाने होत असे . या कार्यक्रमाला दूरदूरवरून भक्तमंडळी येत असत . प्रभूंच्या सहवासात मेळाव्याचा पूर्वार्ध व उत्तरार्ध रंगत असे. पूर्वरंग प्रामुख्याने प्रभूंचे निरूपण व उत्तररंगात भक्तमंडळींबरोबर अनौपचारिक संवाद व त्यावर प्रभूंची हसत खेळत मार्मिक टिप्पणी रंगत असे .पण अशाच एका कार्यक्रमला थोडेसे गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. प्रभूंच्या जवळच्या नातेवाईकांपैकी कुणीतरी गंभीर स्वरूपाच्या आजाराने त्रस्त होते. प्रभूंनी व्यवधान घेतले होते. इतरांच्या दुःखाबाबत प्रभू अतिशय संवेदनाक्षम आहेत. नेहमीप्रमाणे प्रार्थना, स्तोत्र झाल्यावर गर्गे पतीपत्नींचे मनोगत व्यक्त झाले व प्रभूंनी निरूपणास प्रारंभ केला" देहावर काळाची सत्ता आहे. देहाची काळजी घ्यायला हवीच पण देह काळाच्या स्वाधीन आहे याचे भान नित्य असायला हवे . कोण दिवस येईल कैसा याचा न कळे की भरवसा . म्हणूनच क्षण आणि क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षण ईश्वराच्या कृपेने मिळाला आहे याची जाणीव ठेवून त्याचीच भक्ती घडत रहावी असेच आपले वर्तन असायला हवे. ईश्वराने सद्गुरूपाने निराकाराला साकार , अव्यक्ताला व्यक्त व निर्गुणाला सगुण करून भक्ती करायला संधी दिली आहे. सगुणाच्या सहवासात सगुणाशी संवाद करून ही संधी साधायला हवी . मी त्या परमात्म्याचा अंश आहे ही जाणीव दृढ झाली की मग 'खुणावतो काळ सर्वां मज ना त्याची भीती ना पर्वा ' या अवस्थेपर्यंत आपण येऊन पोहचतो. ही काळाच्या परती अवस्था आहे. मिळालेला प्रत्येक श्वास ईश्वराच्या ध्यासात व्यतीत केला तर मृत्युची भीती तर नाहीच उलट मुक्तीचा आनंद आहे. " प्रभू कितीतरी वेळ बोलत होते. मंडळी एकाग्रतेने श्रवण करत होती. नियती घडणाऱ्या घटना मानवी अवतारातील सगुण रूपालाही टाळता येत नाहीत .आपण त्या निर्गुणाची प्रार्थना करू शकतो . बोलता बोलता प्रभू एकदम गंभीर झाले व अनंत अशा अवकाशाच्या साक्षीने धीरगंभीर स्वरात आळवणी करायला लागले ' नमस्कार नमस्कार ...
    Más Menos
    1 h y 10 m