Episode 486 as on 3rd March 2026
No se pudo agregar al carrito
Add to Cart failed.
Error al Agregar a Lista de Deseos.
Error al eliminar de la lista de deseos.
Error al añadir a tu biblioteca
Error al seguir el podcast
Error al dejar de seguir el podcast
-
Narrado por:
-
De:
Guru Shishya Sukhaanandsamwad as on 3rf March 2026
भाव माझा घ्यावे तुझे दर्शन ते केवळ। बैसविले मज प्रेमे चरणी तू जवळ। हास्य मुखी देखुनीया मनी मी सुखावलो। देवा तुझ्या दर्शनाला प्रेमाने मी आलो ॥ प्रभूंबरोबरचा प्रवास हा नेहमीच आनंददायी अविस्मरणीय असे. संभाषणाला एक खुमारी असे. मस्त मोकळा एक्सप्रेस वे, प्रसन्न वातावरण, हलकीशी पावसाची धार , गाडी टाॅप गिअरमध्ये व सर्वात महत्वाचे म्हणजे शेजारी साक्षात प्रभू. स्टिअरिंग व्हील जरी माझ्या हातात असले तरी प्रवासाची दिशा ठरवणार प्रभू. आपल्याला काय ? प्रभूंनी सरळ जा सांगितले की सरळ जायचे , वळायला सांगितले की वळायचे. थांबायला सांगितले की थांबायचे. जीवनाची सूत्रेच प्रभूंकडे सुपूर्द केली होती. असाच प्रवास करत एक दिवस आम्ही तळेगाव मुक्कामी पोहचलो. संत तुकारामांचे देहू गाव तळेगावच्या जवळच आहे. ज्या भंडारा डोंगरावर बसून तुकारामांनी पांडुरंगाची अखंड आळवणी केली त्या पवित्र स्थानावर जाण्याचा मानस प्रभूंनी व्यक्त केला . भोजन व विश्रांती झाल्यावर संध्याकाळी आम्ही भंडारा डोंगरावर जायला निघालो. वळणावळणाच्या नागमोडी रस्त्याने आम्ही पायथ्यापासून शिखरावर पोहचलो . शिखरावर तुकारामांचे अप्रतिम मंदिर आहे. भावपूर्ण अवस्थेत प्रभूंनी तुकारामांचे दर्शन घेतले व त्याच भारावलेल्या अवस्थेत मंदिराबाहेर असलेल्या एका खडकावर जाऊन बसले. जरा विसावू या वळणावर. मावळतीच्या सूर्याकडे टक लावून बघत असताना उत्स्फूर्तपणे प्रभू गायला लागले . " या देहाचिया गावी। काय झाली हो नवलाई। जन्मोजन्मीची पुण्याई ।भाग्ये भेटली विठाई ॥ " प्रभूंचे ते भावविभोर रूप मी अनिमिष नजरेने पहात होतो. तुकारामांची विठाई प्रभूंना नुसती भेटलीच नव्हती तर प्रभूंच्या अंतःकरणात खोलवर उतरली होती. प्रभू , पांडुरंग व तुकाराम असा त्रिवेणी संगम प्रभूंच्या ठिकाणी पहाण्याचे भाग्य मला लाभले होते. या तद्रूप अवस्थेत किती वेळ गेला कुणास ठाऊक! पण त्या देहातीत अवस्थेतही प्रभूंचे देहभान जागृत होते. 'आता निघू या' प्रभू म्हणाले . घरी कार्यक्रम होता. जवळपासची मंडळी येणार होती. तुकारामांना बरोबर घेऊन प्रभू घरी जाण्यास निघाले. देवा तुझ्या दर्शनाला ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.